गानी आपली गानी आपली

आनंदवनभुवनी
स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी

त्रैलोक्य चालिल्या फौजा
सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडीली मोठी, आनंदवनभुवनी

येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी

भक्तासी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तासी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी

येथूनी वाचती सर्वे
ते ते सवर्त्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी

उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी

बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी

अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान, कळो आले

तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव
फिटला संदेह अन्य तत्वी

मुरडुनिया मन उपजलासी चित्ते
कोठे तुज रिते न दिसे रया

दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या

वृत्तीची निवृत्ती आपणां सकट
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज

निवृत्ती परम अनुभव नेमा
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो

चिंब पावसानं रानं झालं आबादानीझाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी

आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहूनि गगन लाजले

आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमधे धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले

त्या विश्वाच्या कणाकणांतून
भरुन राहिले अवघे मी पण
फुलता फुलता बीज हरपले

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे, बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळयांचे शब्द होती, तू हळू निश्वासता
वाजती गात्री सतारी, नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखूनी पलकांत पाणी, घाव सारे साहीले
अन सुखाच्या आसवांचे, मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहूळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी, या फुला सोसेल का ?
नीत नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्याएकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा
तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरीता सागरा

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परी ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

आला आला वारा, संगे पावसाच्या धारापाठवणी करा, सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं, जपलं
काळजाचं पानी किती शिपलं, शिपलं
चेतवून प्राण यांना, दिला गं उबारा

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गावदरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी ना उरला वाली आता, धरती दे गं ठाव

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठीलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती